यात्रा अपडेट्स
  • To support Yuva Sangharsh Yatra, give missed call on 9098390983
  • युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा देण्यासाठी 9098390983 ह्या नंबर वर मिस कॉल द्या.
  • विराट सांगता सभा, दिनांक - १२ डिसेंबर २०२३, वेळ - दुपारी २ वाजता, स्थळ - झिरो माईल, नागपूर
  • Virat Saangta Sabha, Date - 12 December 2023, Time - 2:00 PM, Place - Zero Mile, Nagpur.

युवा संघर्ष यात्रा

युवा संघर्ष यात्रेबद्दल माहिती:

‘युवा संघर्ष यात्रा’ ही युवांच्या नेतृत्वाखालील एक चळवळ आहे ज्याचा मूळ उद्देश महाराष्ट्रातील युवांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जनसमर्थन एकत्रित करणे आणि युवा वर्गाचा आवाज शासनापर्यंत पोहचवणे हा आहे.

या पदयात्रेचा एक भाग म्हणून, आमदार रोहित पवार इतर असंख्य युवांसोबत पुणे ते नागपूर अशी पदयात्रा करतील आणि राज्यातील तरुण-तरुणींना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी जनतेशी संवाद साधतील. संपूर्ण पदयात्रेदरम्यान, युवांना त्यांची मतं आणि अपेक्षा व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

नागपुरमध्ये या युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाल्यानंतर आमदार रोहित पवार विधानसभेत या तरुणाईच्या समस्या मांडतील आणि त्या सरकारपुढे सादर करतील आणि या समस्या ठळकपणे सोडवण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहनही करतील.

माहितीपत्रक डाऊनलोड करा गाणं डाउनलोड करा
Yuva Sangharsh Yatra

कृपया आपली वैयक्तिक माहिती खाली दिल्याप्रमाणे भरा


यात्रेचा मार्ग आणि वेळापत्रक

प्रारंभ
  पवनार
समारोप
  हिंगणी
प्रारंभ
  एरणगाव

यात्रा न्यूज़

यात्रा FAQs

युवा संघर्ष यात्रा ही युवांच्या पुढाकाराने सुरू झालेली असून, महाराष्ट्रातील युवांना भेडसावणार्‍या समस्यांसाठी एकत्र येऊन आवाज उठवणे हे या युवा संघर्ष यात्रेचे उद्दिष्टय आहे.
युवांच्या मागणीवरून आमदार रोहित पवार यांनी ही यात्रा सुरू करण्याची जबाबदारी स्वतः हाती घेतली आहे
तब्बल 45 दिवस चालणारी ही पदयात्रा, २४ ऑक्टोबरला सुरू होऊन ७ डिसेंबर या दिवशी संपणार आहे. या काळात महाराष्ट्रातील तरुणांच्या समस्या जाणून घेण्याचे ध्येय आमदार रोहित पवार यांचे आहे.

या यात्रेला तुम्ही अनेक मार्गांनी पाठिंबा देऊ शकता.

१) तुम्ही 90983 90983 या क्रमांकावर वर मिसकॉल देऊन या यात्रेत सहभागी होऊ शकता.

२) वेबसाइटवरील फॉर्म भरून तुम्ही युवा संघर्ष यात्रेत सामील होऊ शकता.

३) यात्रेदरम्यान इतर युवांसमवेत तुम्ही चालू शकता.

४) तुम्ही यात्रेच्या संकल्पनेबाबत इतरांना माहिती सांगून सुद्धा या यात्रेमध्ये तुमचे समर्थन देऊ शकता.

ही यात्रा जरी मुख्यतः तरुणांच्या समस्यांसाठी लढत असली तरी कोणीही या यात्रेत सामील होऊ शकते अथवा या यात्रेस पाठिंबा देऊ शकते.
नाही, युवा संघर्ष यात्रेला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्याचा पाठिंबा नाही. हा युवांनी, युवांसाठी काढलेला उपक्रम आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून हजारो युवा हे या यात्रेत सहभागी होण्यासाठी पुढे येत आहेत.
७ डिसेंबर रोजी ही यात्रा नागपूर शहरामध्ये पोहोचणार असून त्याच दिवशी विधानसभेच्या अधिवेशनात आमदार रोहित पवार युवांचे हे सर्व प्रश्न मांडणार आहेत.
हजारो युवांसह रोहित पवार पुणे ते नागपूर पायी चालत जाणार आहेत आणि या मोहिमेदरम्यान ते युवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावे, शहरे, तालुके आणि जिल्ह्यांतील लोकांशी संवाद साधणार आहेत.
सध्या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आपण पुणे ते नागपूर 10 जिल्ह्यांतून चालत जाणार आहोत. पुढे महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांचा समावेश करण्यासाठी पुढील टप्प्याचे नियोजन केले जाईल.